Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

धुमाकूळ घालणारी वाघीण जेरबंद

धुमाकूळ घालणारी वाघीण जेरबंद 


मूल :-  तालुक्यातील चितेगाव, मरेगाव , आकापूर, एम आय डी सी परिसर या ठिकाणी आपल्या पिल्ला सहीत धुमाकूळ घालणारी वाघीण बुधवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान  उमा नदीच्या परिसरात जेरबंद झाली. या वाघिणीने नुकतेच  चितेगाव येथील शेषराज पांडुरंग नागोसे या युवा शेतकऱ्याचा बळी घेतलेला होता. शेतात भाजीपाला पिकासाठी पाणी करण्यासाठी गेलेल्या शेषराजवर हल्ला करून वाघिणीने  ठार केले होते. तसेच या वाघिणीच्या हल्ल्यात चार ते पाच जण बळी गेल्याचे समजते. ही वाघीण आकापूर,मरेगाव ,एमआयडीसी परिसर, चितेगाव आणि  उमा नदी काठचा परिसर तिने वेढलेला होता. नागोसे यांना ठार केल्यानंतर नागरिकांनी नरभक्षी वाघीणीला जेर बंद करण्याची मागणी केली होती. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत ठोस पावले उचलत वाघीणीला जेरबंद करण्यासाठी प्रत्यक्ष कॄती अवलंबली.  त्यासाठी वन विभागाचा मोठा फौज फाटा ,शार्प शूटर कामाला  लागले होते. ठिकठिकाणी पिंजरे आणि कॅमेरे लावण्यात आले होते. बुधवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान वाघीण जेरबंद झाली. ही कारवाई मुख्य वनसनरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे, सावलीचे वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे नेतृत्वात वनविभागाच्या चमूने नरभक्षी वाघिणीला जेरबंद केले. चंद्रपूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगावकर यांनी सदरचे वाघिणीला बेशुद्ध केले. वाघाला जेरबंद केल्याने नागरिकांनी वनविभागाचे आभार मानले आहे. परिसरातील शेतकरी, नागरिकांनी सुटकेचा नि:श्वार्थ सोडला आहे.

Post a Comment

0 Comments