Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

डॉ.आंबेडकरांच्या जयंती निमित्याने भीम जयंती समितीचा स्तुत्य उपक्रम

डॉ.आंबेडकरांच्या जयंती निमित्याने भीम जयंती समितीचा स्तुत्य उपक्रम

मूल प्रतिनिधी

 
मूल शहरातील भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रम करून साजरी करण्यात आली. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत गांधी चौक येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना नोटबुक चे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महेश रामटेके सहायक शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिभा भेट दिली. यावेळी बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक किशोर घडसे, संचालक तुलाराम घोगरे उपस्थित होते.

बस स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट देऊन महात्म्यांचे विचार व त्यांनी केलेल्या कार्याचा प्रचार करण्यात आला. यावेळी वाहतूक नियंत्रक आणि कर्मचारी उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले, यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर देवेंद्र लाडे, डॉक्टर तीरथ उराडे, डॉक्टर वसीम शेख आदी उपस्थित होते. या सर्व स्तुत्य उपक्रमात भीम जयंती उत्सव समिती मूलचे काजू खोब्रागडे, शाम उराडे, अतुल गोवर्धन, सुरेश फुलझेले, कुमार दुधे, बालू दुधे, संतोष घुटके आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments