बेताची परिस्थिती.... निशान झाला एमबीबीएस
तालुक्यातील दाबगाव मक्ता येथील विजय तावाडे यांचा मुलगा निशांत तावाडे हा वैद्यकीय अभ्यासक्रम एम. बी. बी. एस. ही पदवी उत्तीर्ण होऊन वैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. घरची परिस्थिती बेताची असताना वडील विजय तावाडे यांनी निशांत ला प्रोत्साहन देत निशांत ला प्रयत्नरत रहा. मी तुला पैशाची कमतरता भासू देणार नाही. त्यासाठी आर्थिक भार सोसावा लागला तरी चालेल असा विश्वास दिल्याने तो वैद्यकीय सेवेची पदवी उत्तीर्ण करून आपल्या कुंटूबासोबतच आपल्या गावाचे पर्यायाने आपल्या मूल तालुक्याचे नाव अधोरेखीत केले आहे. त्यामुळे निशांतचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता या गावाची लोकसंख्या जवळपास १०५३ आहे. विशेष बाब म्हणजे या गावात विविध विभागात नोकरीला लागलेले १०० जण आहेत. त्यामुळे हे गाव आजही सुशिक्षिताचे गाव म्हणुन ओळखले जाते. काही युवक देश सेवेसाठी सैनिक म्हणून कार्यरत आहेत तर काही जण पोलिस खात्यात काम करीत आहेत. वनविभाग, कृषी तसेच शासनाच्या विविध विभागात कार्यरत आहेत. आकाश रविंद्र चिचघरे हा कृषी क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून आपल्या गावाचे नाव ऊज्वल करीत आहे. निशांत विजय तावाडे यांचे वडील विजय तावाडे हे तहसील कार्यालयात अर्जनिवीसचे काम करून मिळेल त्या रक्कमेत आपल्या कुटुंबांचे पालन पोषण करीत त्यातून आपल्या मुलाला देखील काही रक्कम पोटाला चिमटा लावुन पाठवून आपल्या ध्येयाकडे विचलीत न होता अभ्यास करण्याचा सातत्याने सल्ला देत असत. पैशाची अडचण पुढे न आणता तू फक्त आपल्या ध्येयाकडे मन एकाग्र कर हा मौलिक सल्ला गिरवित निशांतने एम. बी. बी. एस. ही पदवी मिळवुन वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. आपल्या गावातील मुलगा डॉक्टर झाला याचा अभिमान संपूर्ण दाबगाव मक्ता वासियांना आहे. आपले ध्येय निश्चित असले तर यश नक्कीच मिळते हाच संदेश निशांत इतर युवकांना देत आहे.निशांतच्या या हिंमतीला दाबगाव मक्ता वासियांचा सलाम!
0 Comments