जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोंभुर्णा महिला एकता समितीचे वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.आजच्या काळातील स्त्री कुठेही मागे नाही ते कोणतेही क्षेत्र असो ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे याचा आज पोंभुर्णा सारख्या छोट्या गावात आला आज सावित्रीच्या लेकीनी बाईक रॅली काढून शहर दुमदुमले यावेळी पोंभुर्णा शहर आणि तालुक्यातील महिलांनी सहभागी होत महिला दिनाचा जागर करण्यासाठी एकत्रित झाल्या. रॅलीची सुरुवात महावितरण विद्युत ऑफिस इथून करण्यात आली यावेळी आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला माल्यार्पण झाले त्यानंतर फुले चौक येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळ्याला माल्यार्पण झाले. तिथून गांधी चौक मार्गे शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आंबेडकर चौक मार्गे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चौक येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून महिला दिनाच्या शुभेच्छा देताना महिला नारे देत महिला दिनाचा जागर महिलांनी केला. बाईक रॅली महिला दिनाच्या औचित्यने पोंभुर्णा सर्व स्तरातील महिला सहभागी झाल्या. सर्व जाती धर्म पंथ पक्ष सर्व महिला पोलीस विभाग, आरोग्य विभाग, तहसील कार्यालय सर्व शासकीय कार्यालयातील महिला सर्वजनी उत्साहाने सहभागी झाले आणि खऱ्या अर्थ्याने पोंभुर्णा एकता महिला समिती म्हणून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्का आत्राम सुलभा पीपरे वैशाली बोलमवार सुनीता म्यॅकलवार, रजिया कुरेशी, माधुरी नैताम, ज्योती बुक्कावार, प्रिया मंगळगिरीवार, स्वाती खोब्रागडे, प्राची मुलकलवार, पपीता पोलपोलवार उषारांनी वनकर, नंदा कोटरंगे, मनीषा थेरे, आकाशी गेडाम, बोडाले,विना कुळमेथे, राजश्री जांबुलवार कोमल सांगिडवार, नेहा बघेल, मनीषा थेरे, उषारांनी वनकर, गाभाने मॅडम, अनिता खडसे, दामिनी काकडे, रुपाली आवारी वैष्णवी श्रीकोंडावर,संध्या आत्राम बालचंद वनकर, पायल ठाकरे, रुपाली आडे श्वेता सातपुते सर्वांनी परिश्रम घेतले.
आजच्या आधुनिक युगातील स्त्री कुठेही कमी नाही ती प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केल आहे आज असच प्रत्यय पोंभुर्णा मध्ये सुद्धा आला सर्व महिलांनी एकत्रित येत बाईक रॅली काढली.खरं तर सर्वाना एकत्रित करून कार्यक्रम करणे कठीण वाटत होते परंतु पोंभुर्णा तालुका आणि शहर मधील महिलांनी विविध कार्यालय यांना एकत्रित करून आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला एका समजला घेऊन एका पक्षाला घेऊन काम करणं सोपं असत पण सर्वाना एकत्रित करून करणे नवीन सुरुवात करणे पण खरंच आज सर्व महिलांना सहभागी होऊन आज महिला म्हणून आनंद घेतला.
0 Comments