Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

आनंद नगर बेंबाळ येथे हातपंपाचे भूमिपूजन

आनंद नगर बेंबाळ येथे हातपंपाचे भूमिपूजन


मूल प्रतिनिधी


मुल तालुक्यातील मौजा बेंबाळ येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत कार्यालय बेंबाळ येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या शुभहस्ते हातपंपाचे भूमिपूजन आनंदनगर बेंबाळ येथे करण्यात आले.

आनंद नगर वार्ड क्रमांक चार येथे काही भागात पिण्याच्या पाण्याची व वापराच्या पाण्याची कित्येक वर्षापासून भीषण समस्या होती. ग्रामपंचायत कमिटीने यावर तात्काळ ठराव पारित करून पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून हातपंपाचा ठराव मंजूर केला. वार्डातील काही घरांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत होते. यामुळेच वार्डातील नागरिकांनी सुद्धा पाण्याचा सोयी सुविधाची मागणी केली होती.

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील काही दिवसांपासून बंद असल्याने पाण्याची भीषण समस्या जाणवत होती. नागरिकांना पाण्याची सोय व्हावी म्हणून ग्रामपंचायत सरपंच चांगदेव केमेकार, उपसरपंच देवाजी ध्यानबोईवार, सदस्य आशाताई मडावी, गावातील प्रतिष्ठित नागरिक दिपक वाढई, युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन निलमवार, उमाकांत मडावी, दामोदरजी देशमुख, नरेंद्रजी शेमले,मल्लेश मुद्रिकवार, धनंजय आकनुरवार,विवेक चनकापूरे,मुन्ना मुद्रिकवार, प्रकाश जिल्हेवार,सुधाकर जिल्हेवार यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून भुमीपूजन सोहळा पार पडला.

Post a Comment

0 Comments