प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्राथमिक शाळेत वॉटर कुलर चे उद्घाटन ; उपआयुक्त ढोके यांची उपस्थिती
मूल प्रतिनिधी
प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्राथ शाळा मूल येथे वाॅटर कुलर (आरो मशिन) चे संघमित्रा ढोके उपआयुक्त प्रशासन नागपूर यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. सौ लक्ष्मी येनप्रेडीवार शिक्षण द्वारा संचलित प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्राथ शाळा मुल येथील शाळेला संघरत्नम ट्रस्ट नागपूर यांचे कडून लहान मुलांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले. संघरत्नम ट्रस्ट यांनी या शाळेला वाॅटर मशिन (आरो मशिन) देणगी स्वरुपात संघरत्नम ट्रस्ट यांनी या शाळेला देण्यात आली. हया कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवडुजी येनप्रेडीवार संस्थेचे सचिव तथा युवक बिरादरी संघटना अध्यक्ष तथा संस्थापक म्हणून उपस्थित होते. मुल नगरपरिषद मुख्याधिकारी संदिप दोडे यांची उपस्थिती होती. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप निकुरे, प्रमुख पाहुणे वसंतरावजी रामटेके, इशवरजी चिताडे पालक वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन कु. सोनाली मुलकलवार (शिक्षिका) यांनी केले. त्याचप्रमाणे शाळेचे शिक्षक योगिराज वरठी ( शिक्षक), कु. सोनु येनप्रेडीवार(शिक्षिका), सुनिल बोरकर (शिक्षक). सहारे शिक्षिका, नवघडे शिक्षिका त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका कु. तक्षशिला रामटेके यांनी आभार प्रदर्शन केले. आभार प्रदर्शनानंतर चहापाणी होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments