महिला दिनाचे महत्त्व म्हणजे महिलांना त्यांच्या अधिकाराबद्दल जागरूक करून स्वावलंबी बनविणे होय.हा दिवस महिलांच्या सामाजिक,आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे.
विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या....
शेतामध्ये राबून सोन पिकविणाऱ्या
मानास पात्र ठरलेल्या....
घर संसार सजविणाऱ्या
सर्व महिलांना मानाचा प्रणाम
या दिनाच्या निमित्ताने लोकांना..समाजाला महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिली जाते.महिलांनी न डगमगता संघर्षाला मात करून विजय ,यश संपादन करावे हे सांगितले जाते. महिलांच्या हक्क चळवळीतील ऐक केंद्रबिंदू म्हणजे जागतिक महिला दिन होय.....हा दिवस महिलांच्या संपूर्ण क्षेत्रातील कामगिरीच्या यशोगाथा सांगणारा दिवस होय....महिलविषयी मान...सन्मान आणि प्रेम या दिवसाला व्यक्त करून साजरा केला जातो हा जागतिक महिला दिन.
आज कोणत्याही बाबतीत महिला मागे नाही.प्रत्येक आहेत क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे स्त्री ने..पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती स्वतःचे व्यक्तीमत्व घडवित आहे
आज समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचा ही पुरुषा इतका वाटा आहे.
जागतिक महिला दिनातून स्त्री कमजोर नाही बळकट आहे ...ती सक्षम आहे हे सांगितले जाते.कोणत्याही आव्हानांना ti ठामपणे लढू शकतेअशी अद्भुत शक्ती तिच्याजवळ आहे हे सांगितले जाते.
हक्कासाठी समानतेसाठी अविरत प्रयत्न करण्यासाठी तिला हिंमत देण्यासाठी हा जागतिक महिला दिन.मी सर्व महिलांना सांगू इच्छिते की जगाचा इतिहास रचियता आहोत आपण....कुठेच स्वतःला कमी समजू नये...जेव्हा स्त्री शक्ती एकत्र होते तिथे अशक्य असे काही च नसते.
म्हणतात की स्त्रिया संपूर्ण जगातील सुंदर आणि भव्य प्राणी आहेत आणि हे सत्य आहे. प्रत्येक महिलांची कल्पनाशक्ती इतकी वेगवान असते की क्षणात जीवनाचा सुखकर आनंदमय प्रवास ती करू शकते.
अभीमान असावा प्रत्येक स्त्री ला दुसऱ्या स्त्री चा.....कारण विविध नात्यांची खाण आहे स्त्री...महिलांमध्ये दडलेल्या निःस्वार्थ त्याग आणि प्रेमळ मायेला प्रणाम करते मी.
सरते शेवटी म्हणते..
वेळ आली ऊठ
तू नारी
युग निर्माण कर तुझे
विश्वासाने प्रगतीच्या वाटेवर
तुला चालणे आहे..सतत ...निरंतर...
स्वतःच्या संस्कृतीने
निर्माण कर नवे विश्व
जगाची आशा तू
ऐक सन्मान तू
कर तयार ऐक नवा इतिहास
स्वयंसिद्ध नारी तू... नारी तू
0 Comments