जागतिक महिला दिन करु या उत्साहात
बसून न राहू आता नुसतेच घराघरांत
जागतिक महिला दिन करु या उत्साहात
बसून न राहू आता नुसतेच घराघरांत ||1||
महिलांच्या हक्कांसाठी लढू या साऱ्याजणी
देवू एकमेकींना साथ आपण साऱ्या भगिनी ||2||
मतदानाच्या हक्कासाठी उतरल्या रस्त्यावर ८ मार्च या दिनी
अधिकार मिळाला म्हणून साजरा करतात 'जागतिक महिला दिन' भगिनी ||3||
महिलांनो रांधा, वाढा, उष्टी काढा एवढेच न अपुले क्षेत्र
आकाश -पाताळ-धरती या तिन्हीतही वावरा सर्वत्र ||4||
नारी नाही तू अबला, दाखविलेस कधिचेच तू आहेस सबला
तिन्ही लोकी वाजतो डंका, सर्वत्र आहे तुझाच बोलबाला ||5||
पण भगिनी, स्वातंत्र्य म्हणजे नसे स्वैराचार हे तू जाणूनी घे
स्त्री-मर्यादा न उल्लघंता, संस्कारित आदर्श स्त्रीचा वसा घे ||6||
स्वतः मधली रणरागिणी, सौदामिनी निरंतर तू तेवत ठेव जागतिक महिला दिनी तुझ्यासोबत आम्ही सर्व मग तुला कशाचे भेव ||7||
कवयित्री
प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर
माजी नगराध्यक्षा मूल
0 Comments