Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सुरवी महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींना दिले संरक्षणाचे प्रशिक्षण ; महिलादिनी स्तुत्य उपक्रम

शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींना दिले स्वरक्षणाचे प्रशिक्षण तथा व्यावसायिक मार्गदर्शन


गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर द्वारा संचालित शुरवी महिला महाविद्यालय मूल येथे दि. ८ मार्च २०२५ रोज शनिवारला जागतिक महिला दिनाचे भव्य आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात ज्येष्ठ समाज सेविका डॉ. शैलजाताई देशपांडे, नागपूर तथा सौ. रत्नमालाताई भोयर, माजी नगराध्यक्षा, मूल यांनी विशेष मार्गदर्शन केले सभोवतालच्या असुरक्षित वातावरणात मुलींची भूमिका कशी असावी याविषयी डॉ. शैलजाताई देशपांडे यांनी विशेष मार्गदर्शन केले तर आमिशांना बळी न पडता, नाही म्हणायला शिका हा संदेश सौ. रत्नमालाताई भोयर यांनी दिला. मा. हरिश्चंद्र राणे, सहाय्यक कमांडर, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक कमांडो, विशेष संरक्षण गट प्रशिक्षक आणि एनएसजी प्रशिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली कमांडो हरिचरण जमाटीया आणि टीम यांनी विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण दिले प्रशिक्षणाअंती मा. हरिश्चंद्र राणे यांनी विद्यार्थिनींना आणि उपस्थित महिलांना व्यावसायिक मार्गदर्शन दिले सदर कार्यक्रमात शासकीय कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी तथा प्राध्यापकांनी महिला बचत गट तथा मूल शहरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला उपरोक्त कार्यक्रमात कार्यकारी प्राचार्या हर्षा खरासे यांनी अध्यक्षीय स्थान भूषवले तर विशेष अतिथी म्हणून डॉ. शैलजाताई देशपांडे, नागपूर,मा. सौ. रत्नमालाताई भोयर, माजी नगराध्यक्ष मूल, मा. जयश्री चनूरवार अध्यक्षा, लोकमत सखी मंच मूल मा. कॅप्टन हरिश्चंद्र राणे कमांडो हरिचरण जमाटीया उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स. प्रा. डॉ. मीनाक्षी राईंचवार यांनी केले तर सूत्रसंचालन स. प्रा. रुपाली वाढई यांनी केले स. प्रा. सौरभ तरारे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. सदर कार्यक्रमास संस्था अध्यक्ष मा. श्री सुदेश कुमार कापर्ती संस्था सचिव मा. श्री राजेश्वर सुरावार यांनी शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयीन प्राध्यापक आणि शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments