Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे श्री संत तुकाराम महाराज जयंती उत्साहात साजरी

मूल येथे श्री संत तुकाराम महाराज जयंती उत्साहात साजरी


जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज जन्मोस्तव सोहळा मूल येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही कुणबी समाजाच्या वतीने उत्साहात साजरा झाला. शहरात भव्य रॅली व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते. रॅलीची सुरुवात श्री. संत तुकाराम महाराज यांचे फोटोला माल्याअर्पण पुजा करीत नवभारत शाळेच्या प्रांगणातून करण्यात आली. रॅली मुख्य मार्गाने भाग्यरेखा सभागृह मूल येथे समाप्त करण्यात आली.

कार्यक्रमाला उदघाटक म्हणून अशोक झाडे प्राचार्य नवभारत विद्यालय मूल, कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नमालाताई भोयर, माजी नगराध्यक्षा तथा कवियत्री मूल, प्रमुख अतिथी म्हणून गणेशजी मांडवकर, नथ्थुजी पाटील आरेकर,  सुनिल शेरकी, विलास मांडवकर, दिलीप भुरसे, प्रभाकर भोयर, नंदकिशोर शेरकी,  गुरुभाउ गोहणे, रोशन नरुले उपस्थित होते. मंचावर उपस्थित मान्यवर समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन भावना चौखुंडे प्रास्ताविक कल्पना गोहणे तर आभार प्रदर्शन विद्या बोबाटे यांनी केले. सदर कार्यक्रमाला मूल शहरातील व तालुक्यातून भव्य जनसमुदाय एकत्र जमले होते. या कार्यक्रमाचे आयोजन मूल तालुका कुणबी समाज संघटना व श्री. संत तुकाराम महाराज महिला बचत गट यांचे संयुक्त करण्यात आलेले होते. पार पडलेल्या जन्मोत्सव सोहळ्याच्या यशस्वीतेकरिता कुणबी समाज संघटनेच्या पदाधिका-यांनी अथक परिश्रम घेत श्री. प्रशांतजी बोबाटे, अरुण चौखुंडे, धनराज शेरकी, संतोष घोगरे, वैभव तांगडे, विलास घोगरे, रामदास उरकुडे, विद्याताई बोबाटे, भावनाताई चौखुंडे, मेघाताई घोगरे, उर्मिला शेरकी, पिंकी चिताडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments