राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सतिश डागोर यांचे भव्य स्वागत
अखिल भारतीय सफाई मजदूर कां.कामगार संघटना रजि.न.7262 महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने नागपूर येथे महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे मुंबई (राज्यमंत्री दर्जा) चे अध्यक्ष सतीश भैय्याजी डागोर यांचे भव्य स्वागत संघटनेच्या वतीने करीत शुभेच्छा देण्यात आले. सतीश डागोर यांची मुंबई येथे शपथविधी झाल्यानंतर पहिल्यांदाच स्वागवी म्हणजेच नागपुरातील वाल्मिकी धाम येथे आले. त्यावेळी विदर्भातील सामाजिक संघटना, कामगार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते भेटून स्वागत करण्याकरिता आले होते. स्वागतावेळी डागोर यांनी राज्यातील सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
त्यावेळी प्रमुख उपस्थित संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री जयसिंगजी कछवा, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील महातव, मुल तालुका अध्यक्ष सदिप पारचे, चंद्रपूर जिल्हा शाखेचे सल्लागार लक्ष्मीकांत सारीटेक आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments