मूल येथिल शिवटेकडीवर भव्य महाशिवरात्री उत्सव ; दर्शन सोहळा व खिचडी वितरण
मुल शहरातील शिवटेकडी येथे 40 वर्षांपूर्वी दिवंगत स्वर्गीय जनार्दन म्हस्के यांना झालेल्या साक्षात्कारातून त्यांनी सदर टेकडीवर शिवमूर्ती व पिंडीची स्थापना केली, तेव्हापासूनच दर महाशिवरात्रीला तिथे भक्तांची रीघ असते, शिवमूर्ती सोबतच परिसरात तिरुपती बालाजी- पदमीनी, हनुमंत, राधाकृष्ण या मूर्त्यांची पण स्थापना झालेली आहे, पुंडलीकजी म्हस्के महाराज यांच्या पुढाकारातुन दरवर्षी येथे महाशिवरात्री चा मोठा उत्सव व्हायचा, म्हस्के महाराजांच्या निधनानंतर शिवटेकडी उत्सव समिती मुलच्या माध्यमातून हा उत्सव सुरू आहे, शहरातील व परिसरातील हजारो भाविक इथे दर्शनाला येत असतात, महाशिवरात्री चा उपवास असतो त्यामुळे टेकडी परिसरात समिती च्या माध्यमातून इथे उपवास खिचडी वितरण होत असते, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भक्तजनांनी दर्शन सोहळा व खिचडी वितरणाचा लाभ घ्यावा अशे आवाहन शिवटेकडी उत्सव समितीच्या माध्यमातून केले आहे.
0 Comments