Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शुभहस्ते होणार रुग्णवाहिकेचे लोकार्पण ; विराल चितालिया यांची राहणार उपस्थिती

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शुभहस्ते होणार रुग्णवाहिकेचे लोकार्पण ; विराल चितालिया यांची राहणार उपस्थिती

मुल शहरातील सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेली सामाजिक संस्था जलतरण संघटना, सदर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना संघटनेला मुल परिसरातील जनतेच्या सोयीसाठी रुग्णवाहिका देण्याची विनंती केली होती, आपल्या शब्दावर सदैव ठाम राहत असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी या गोष्टीची आठवण ठेवत जलतरण संघटनेसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली, सदर रुग्णवाहिका ही मूल शहरात दाखल झाली असून दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोज सोमवार ला रामलीला भवन मुल येथे दुपारी 12 वाजता हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे, सदर लोकार्पण हे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते होणार आहे, स्वर्गीय विनोद चितालिया यांच्या स्मृती प्रीत्यर्थ श्रीमती भद्राबेन विनोद चितालिया, श्री विराल विनोद चितालिया,श्री मिलान विनोद चितालिया यांच्या सौजण्यातून ही रुग्णवाहिका मिळाली आहे, सदर सोहळ्यासाठी मुंबईवरून श्री विराल विनोद चितालिया यांची विशेष उपस्थिती असणार आहे, जलतरण संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर रणदिवे ही कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषावतील,सदर सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जलतरण संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments