श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान चा स्नेहमिलन सत्कार सोहळा संपन्न
मूल ( अमित राऊत )
श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान वर्षभर शेकडो साई भक्तांच्या माध्यमातून सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम राबवत असते. याच अनुषंगाने यावर्षी स्नेह मिलन कार्यक्रम झोपला मारुती देवस्थान अजयपुर येथे आयोजित करण्यात आला होता. प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिर्डीला शेकडो सेवेकरी पाठविण्यात येत असते त्या सर्व सेवेकरी साई भक्तांचा सत्कार सोहळा यावेळी करण्यात आला.
सकाळी दहा वाजता नोंदणी व परिचय करण्यात आले. विविध बौद्धिक खेळांचे आयोजन आयोजित केले होते. मंदिर परिसरात असलेली श्री साईबाबांची मूर्ती उपेक्षित असल्याचे आढळल्याने संपूर्ण मूर्ती व परिसराची स्वच्छता करून मूर्तीला अभिषेक करत विधिवत पूजा करण्यात आली. श्री हनुमानजींची सर्व प्रतिष्ठांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सुरुची भोजनानंतर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात शिर्डीला सेवा करून आलेल्या चंद्रपूर हिंगणघाट वर्धा यवतमाळ नागपूर येथून उपस्थित सर्व सदस्यांचा सत्कार समारंभ प्रतिष्ठानच्या वरिष्ठ सदस्य व अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष यांच्या मार्फत करण्यात आला.
सर्वांनी शिर्डी सेवेत आलेल्या सामाजिक व आध्यात्मिक अनुभूती सर्वांनी कथन केली. प्रतिष्ठान मार्फत मिळालेल्या संधीबद्दल आभार मानले. सदस्य प्रतिष्ठानच्या सेवा कार्यात तन-मन-धनाने सहभागी राहण्याचे सांगितले.
विविध खेळांचे पारितोषिक वितरणा सहकार्यक्रमाचा समारोप करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता सचिन गायधने प्रमोद वर्ग सचिन पर्वतकर कुणाल खनके रुपेश महाडुळे देवेंद्र लांजे रोशन निनावे सुरेश सातपुते विघ्नराज पेंढारकर प्रदीप रणदिवे चंदू रणदिवे दत्तात्रय झुल्कंटीवार मुरलीधर शिर्भय जयवंत खंडाळकर लक्ष्मण बोनगीरवार यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन ममता दादू खांडे यांनी तर आभार प्रदर्शन आशा यादव यांनी केले.
0 Comments