चांदापूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी
चांदापूर येथे शिवगर्जना सांस्कृतिक व बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य दोन दिवसीय जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यात दिनांक १८ फेब्रुवारीला इयत्ता दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली, जयंती चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचा एक गट व इयत्ता सहावी व सातवीचा एक गट अश्या दोन गटात सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्याचप्रमाणे दिनांक १९ फेब्रुवारीला गट अ , गट ब, व गट क अशा तीन गटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली . व सोबत Kahoot Quiz अंतर्गत ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली .
सायंकाळी ठिक ५:०० वाजता संपूर्ण गावकऱ्यांतर्फे भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले . व सायंकाळी ठिक ८:०० वाजता सत्कारमूर्तींचा सत्कार व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिवगर्जना सांस्कृतिक व बहुउद्देशीय संस्था चांदापूर व संपूर्ण ग्रामस्यांच्या सौजन्याने मूल तालुक्यातील पहिले सर्च टि.व्ही. न्युज लाइव्हचे संपादक व पत्रकार श्री. अमित राऊत, मुल तालुक्यातील पहिला महिला पत्रकार तथा मूल दर्पन च्या संपादिका कु. कुमुदिनीताई भोयर व झाडीबोली साहित्य मंडळाचे सचिव व कविवर्य श्री. लक्ष्मण खोब्रागडे सर यांचा मानवस्त्र सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला . त्याचबरोबर चित्रकला , सामान्यज्ञान, वक्तृत्व स्पर्धा व kahoot Quiz मधील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन गौरविण्यात आले .
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून चांदापूरच्या सरपंच सौ. सोनीताई देशमुख, अध्यक्ष म्हणून श्री. अनिलजी नैताम मुख्याध्यापक , सत्कारमूर्ती श्री अनित राऊत,कु. कुमुदिनीताई भोयर, श्री. लक्ष्मण खोब्रागडे तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. अतुल तिवाडे, श्री गणपतराव पा. पाल , श्री. विनायकराव पा झरकर, श्री. खुशालराव पा . शेरकी, वेणूताई चिंचोलकर, सुनिताताई कडूकार, वंदनाताई कोरेवार, मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाल, रविभाऊ शेरकी, ताराचंदजी शेडमाके, नवनित चिंचोलकर , सुरेश जिल्हेवार सर, रुपेश परसवार सर, सिंधूताई नैताम मॅडम श्री. कैलास कोसरे सर ,सुरेश देशमुख, पंकज निशाने , वामन नागापूरे आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वसंत पोटे , धिरज पाल यांनी तर प्रास्ताविक नंदकिशोर शेरकी यांनी केले . व आभार प्रदर्शन अंकुश शेरकी यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य मनोज शेरकी, धर्मेंद्र घोगरे, ठकसेन मिसार , बंडू पोरटे, अभिजित चिंचोलकर, दिलीप पोटे, एश्वित शेरकी, कमलेश चुदरी व अन्य सदस्य त्याचप्रमाणें गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य, तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे सदस्य, म. जोतीबा फुले मंडळाचे सदस्य व संपूर्ण गावकऱ्यांनी सहकार्य केले .
0 Comments