Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी शशिकांत गणवीर तर सचिव पदी संतोष शुद्धलवार यांची निवड

मूल तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी शशिकांत गणवीर तर सचिव पदी संतोष शुद्धलवार यांची निवड

 
मूल : मुल तालुका पोलीस पाटील संघटनेची सर्वसाधारण बैठक पोलीस स्टेशन मुल येथे सोमवार (दि.१०) पार पडली. या बैठकीत  जुनी कार्यकारणी विसर्जित करून नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. 
           यावेळी पोलीस पाटील संघटनेचे मूल तालुका अध्यक्ष म्हणून शशिकांत गणवीर यांची तर उपाध्यक्ष म्हणून अमोल वाकुडकर तर सचिव पदी संतोष शुद्धलवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कोषाध्यक्ष म्हणून आशाताई देशमुख तर समिती सदस्य म्हणून माजी अध्यक्ष गोपाल ठिकरे, पुंडलिक जवादे, संगीताताई चल्लावर, प्रतिभा लहामगे, नंदाताई शेंडे, राजू कोसरे, संदीप पोरटे, विजयकुमार दुर्गे सुधीर बांगरे आदींची निवड करण्यात आली.
           या निवडणूक प्रक्रियेचे अध्यक्ष म्हणून माजी अध्यक्ष गोपाल ठिकरे तर पुंडलिक जवादे यांनी काम पाहिले. यावेळी मूल तालुक्यातील बहुतांश पोलीस पाटील उपस्थित होते.
              पोलीस पाटील संघटनेच्या हिताकरिता प्रशासन आणि पोलीस पाटील यांच्यात योग्य समन्वय साधून विविध उपक्रम राबवित संघटनेच्या बळकटीकरणाकरिता प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पोलीस पाटील संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष शशिकांत गणवीर यांनी पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करताना केले.

Post a Comment

0 Comments