मूल च्या राजेश अबोजवार यांनी भगवान श्री विश्वकर्मा पंचमुखी मूर्ती दिली भेट
मूल (अमित राऊत)
श्री भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त मूल येथिल राजेश अशोकराव आबोजवार परिवार यांच्या कडून श्री विश्वकर्मा मंदिर मूल येथे श्री भगवान विश्वकर्मा यांची पंचमुखी मूर्ती भेट स्वरूपात दिली. विश्व ब्राह्मण पांचाळ समाज बहुउद्देशीय संस्था मूल च्या वतीने दरवर्षी जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते. या जयंतीच्या निमित्ताने आबोजवार परिवार ही पंचमुखी मूर्ती भेट दिल्याचे सांगितले.
मूर्तीची प्राणप्रतिष्टा राजेश आबोजवार यांच्या हस्ते करण्यात आली. आबोजवार परिवार यांच्या कार्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे. या सोहळ्यात उपस्थित समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होता.
0 Comments