बोरचांदली येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन; लाभ घेण्याचे आवाहन
मूल (अमित राऊत)
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान व ग्रामपंचायत बोरचांदली यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान व उपचार शिबिर 12 फेब्रुवारी 2025 रोज बुधवार ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरचांदली येथे घेण्यात येत आहे. या शिबिरामध्ये नेत्ररोग , स्त्रीरोग ,बालरोग, अस्थीरोग, त्वचारोग आणि इतर आजाराची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व निदान केल्या जाईल.
तरी गावातील आणि आजूबाजूच्या गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच सौ. ललिता सेमस्कर, उपसरपंच श्री. हरिभाऊ येनगंटीवार, तालुका समन्वयक अनूप नंदगिरवार यांनी केले आहे.
0 Comments