चांदापूर हेटी येथे अवैद्य सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर कार्यवाही ; तीन लाख 22 हजार रुपयांचा माल जप्त
मूल प्रतिनिधी
मुल तालुक्यातील चांदापूर हेटी येथे सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर मुल पोलीसांनी धडक कारवाई केली. चांदापूर हेटी येथे धाड टाकत हिमानी किराणा अण्णाजी ठाकूर यांचेवर एकूण 3 लाख 22 हजार दोनशे तीस रुपयांची मोठी कारवाई केली. या कार्यवाहीने सुगंधी तंबाखूची अवैध विक्री करणारे तसेच छोट्या मार्गाने सुगंधी तंबाखूचे बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या तालुक्यातील सुगंधित तंबाखू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
मुल तालुक्यात चंद्रपूर हे टी येथील हिमानी किराणा दुकानदार अण्णाजी ठाकूर मालकीचे किराणा सामान विक्रीचे दुकानांमध्ये ईगल होला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधी तंबाखू अवैध विक्री करीत बाळगत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार ही कारवाही करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने सुगंधी तंबाखूचे अवैध विक्रीवर प्रतिबंधित केले असताना चंद्रपूर जिल्ह्यातील काही अवैध विक्री बेकायदेशीर रित्या त्यांचे ताब्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू बाळगून अवैद्य विक्री करीत असल्याने अवैध विक्रेत्यांवर अंकुश बसावा याकरिता प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्यासंबंधीत ही कार्यवाही केली.
सदर कार्यवाही चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, प्रभारी अधिकारी प्रमोद चौगुले, मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोरकर आदींनी केली.
0 Comments