Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे स्मृtam वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव उत्साहात

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे स्मृtam वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव उत्साहात 


मूल येथील शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे स्मृtam वार्षिक स्नेहसंमेलन 2025 चे आयोजन दिनांक 19 जानेवारी 2025 रोज रविवारला कन्नमवार सभागृह मूल येथे करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसगी अध्यक्ष म्हणून ऍड अनिल वैरागडे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ मूल मुख्य अतिथी म्हणून संदीप दोडे मुख्य अधिकारी नगर परिषद मूल, तसेच सुमित परतेकी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन,मूल वर्षा पिपरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, मूल डॉ. गणेश आगलावे, प्राध्यापक कर्मवीर महाविद्यालय मूल, दीपक बाकडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापान समिती बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल तसेच विद्यालयाचे प्राचार्य विनोद बोलीवार बल्लारपूर पब्लिक स्कूल,मूल तसेच विद्यार्थी प्रतिनिधी कुमार अंश तेलसे व विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी कशिश रामटेके हे मंचवार विशेष अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते. आणि कार्यक्रमांची सुरवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य विनोद बोलीवार यांनी केले व विद्यार्थी व पालकांना आपल्या विद्यालयात घेण्यात आलेल्या वर्षभरात केलेल्या शैक्षणिक व अशैक्षणिक कार्यक्रमाचा अहवाल वाचून दाखवला. तसेच पुढील येणाऱ्या शैक्षणिक सत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याबाबत आपल्या प्रस्तावना द्वारे संकल्प केला इतर मान्यवारांनी आपल्या भाषणाद्वारे पालक व विद्यार्थी यांनी पुढील शैक्षणिक वाटचाली करिता प्रोत्साहनात्मक स्वतः च्या जीवनातील उदाहरण व दाखले देत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात वर्ग नर्सरी ते वर्ग 10 वी पर्यंतचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेतला व आपल्या समूहनृत्य द्वारे तसेच नाटिका सादर करीत पालकांना व मान्यवराना मंत्रमुग्ध केले व मोठया सख्यांनी पालकांनी उपस्थित दाखवून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला कार्यक्रमात पालकांना शाळेमध्ये घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिल्ड देऊन करण्यात आले तसेच विद्यार्थांनी वेगवेगळ्या कार्यक्रमासंदर्भात पदके पारितोषिके व विजय चिन्ह देऊन विद्यार्थाचा सत्कार करण्यात आला सोबतच सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रोत्साहन म्हणून पदक देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सास्कृतिक प्रभारी तोषी जयस्वाल व विद्यार्थिनी कुमारी प्रज्ञा रामटेके वर्ग 8 वा, कुमारी सिमरन सिडाम, कुमार निशांत भेंडारे, कुमारी लिसा खियांनी, कुमार अंश तेलसे, कुमारी कशिश रामटेके वर्ग 10 वा यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नृत्य शिक्षक प्रणित नमुलवार आणि शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शैक्षणिक प्रभारी दुर्गा कोटगले हिने केले कार्यक्रमांची सांगता वंदे मातरम या राष्ट्रगनाने झाली.

Post a Comment

0 Comments