सहाय्यक महसूल अधिकारी शास्त्रकार यांनी काढली देशभक्तीपर रांगोळी ; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले कौतुक
मूल (अमित राऊत)
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मूल शहरातील तहसील कार्यालयात मोठ्या थाटामाटात दरवर्षी साजरा केला जातो. विशेष म्हणजे मूल तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी रोहित शास्त्रकार हे दरवर्षी राष्ट्रीय सणा निमित्त तहसील परिसरात येणाऱ्या सर्वांचे स्वागत करीता रांगोळी काढत असतात. यावर्षी सुद्धा त्यांनी भव्य अशी देशभक्तीपर रांगोळी काढली आहे. शास्त्रकार यांच्या अंगी असलेले रांगोळी काढण्याचे गुण त्यांच्या कलेतून दिसून येते.
मूल तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात, थाटात झेंडावंदन करण्यात येते. शहरातील संपूर्ण शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक वृंद प्राचार्य, सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी, शहरातील राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते, शहरातील नागरिक तहसील कार्यालयातील झेंडावंदनाला मोठ्या संख्येने उपस्थित असतात. शास्त्रकार यांनी काढलेली रांगोळी बघून त्यांचे कौतुक केल्या जात आहे. उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार मृदुला मोरे, नायब तहसीलदार यशवंत पवार, नायब तहसीलदार नंदकिशोर कुमरे, नायब तहसीलदार ओंकार ठाकरे यांनी सुद्धा शास्त्रकार यांच्या कलेचे कौतुक केले आहे.
0 Comments