Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

जगात भूत कोठेच नाही, तो माणसाच्या डोक्यात असतो.. -हरिभाऊ पाथोडे*


जगात भूत कोठेच नाही, तो माणसाच्या डोक्यात असतो.. -हरिभाऊ पाथोडे

या जगात भूत कोठेच नाही,  असेलच तर तो माणसाच्या डोक्यात असतो. भूत दाखवा आणि सत्तर लाख रुपये मिळवा. असे आव्हान अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले. ते मुल तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, टेकाडी येथे  दिनांक १७ जानेवारी ते २३ जानेवारी २०२५ पर्यंत, मारिया महाविद्यालय मुल व ग्राम पंचायत टेकाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष शिबिरात केले.
त्यांनी 'चमत्कारामागिल विज्ञान' विविध प्रयोगाद्वारे समजावून सांगितले. त्यांनी भूत, भानामती, मंत्र-तंत्र, जादुटोणा, देवी अंगात येणे यामागील फोलपणा विशद केला. याप्रसंगी अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चंद्रपूर जिल्हा सहसचिव अनिल लोनबले यांनी समितीची भूमिका मांडली. 
मारिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाष्कर सुकारे यांनी अंधश्रद्धा मुक्त समाज घडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. प्रफुल निरुडवार, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बंडू गोहणे, ग्राम पंचायत सदस्य गणपत जराते प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा. गजानन मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील विद्यार्थ्यांनी तथा गावकऱ्यांनी हजेरी लावली.

Post a Comment

0 Comments