Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे "प्राणी मित्र" पुरस्काराने सन्मानित

संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे "प्राणी मित्र" पुरस्काराने सन्मानित


नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, मूल च्या वतीने संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष तथा सदस्यांचा "प्राणी मित्र" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला.

उमेशसिंह झिरे यांना आणि संजीवन पर्यावरण संस्थेला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उमेशसिंह तेजसिंह झिरे यांना बालपणापासून सापा विषयी विशेष आकर्षण होते.२००० साली संजीवन पर्यावरण संस्थेची स्थापना करण्यात आली. २०११ ला ठाणे (मुंबई) येथे तत्कालीन वनमंत्री श्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते राज्यस्तरीय सर्पमित्र म्हणून सन्मान करण्यात आला. २००० साला पासून आजतागायत दोन दा वनविभाग व संजीवन पर्यावरण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 'सर्पमित्रांची कार्यशाळा' या कार्यक्रमाचे आयोजन करुन अनेक नवीन सर्पमित्र तयार करण्यात आले. तसेच संजीवन पर्यावरण संस्थेच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, वन्यप्राणी संवर्धन, पक्षी संवर्धन, फुलपाखरू संवर्धन असे अनेक कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येतात. 

मूल, सावली, पोंभुर्णा व सिंदेवाही तालुक्यात सर्पदंश व त्यावरील उपचार या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येतात. मूल उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचारासाठी स्थानिक डॉक्टरांना मागील १५ वर्षांपासून सहयोग करणे. त्यामुळे आजपर्यंत अनेक विषारी सापांच्या दंशाचे रूग्णांचे जीव वाचवण्यात मोठे योगदान आहे. मूल, सावली, पोंभुर्णा व सिंदेवाही तालुक्यात वन्य प्राण्यांची शिकार करणारे अनेक आरोपी वनविभागाच्या मदतीने पकडुन दिले. त्यांचेवरील नमूद केलेल्या तालुक्यातील न्यायालयात खटले सुरू आहेत.

अनेक जखमी वन्य प्राण्यांवर वनविभागाच्या माध्यमातून व पशुवैद्यकीय अधिकारी यांचे सोबत मिळून उपचार करून त्यांना सुखरूप जंगलात सोडण्यात आले. झिरे यांच्या कामाची दखल घेत अनेक सामाजिक व पर्यावरणवादी संस्था, संघटना आणि माजी मंत्री सुधिर मुनगंटीवार , माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. वनविभागाच्या सर्व उपक्रमात उमेशसिंह झिरे, संजीवन पर्यावरण संस्थेच्या सर्व सदस्यांचा उल्लेखनीय सहभाग असतो.

Post a Comment

0 Comments