आदिवासी मुला-मुलींची शासकीय वसतिगृहात क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात
मूल (अमित राऊत)
आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह मूल येथे दिनांक 13.01.2025 व दिनांक 14.01.2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले. दिनांक 13.1.2025 रोजी विद्यार्थ्यांकरीता विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये 100 मीटर धावणे, गोळा फेक, लांब उडी, कब्बडी, क्रिकेट चा समावेश होता. क्रीडा स्पर्धेचे उदघाटन कु. संगीत गजभिये (गृहपाल) यांनी केले.
त्यानंतर दिनांक 14.01.2025 रोजी दुपारी 12.00 ते 02.00 या वेळेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व बक्षिसे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन मा.श्री. सुमित परतेकी (पोलीस निरीक्षक, मूल) यांनी केले. कार्क्रमाचे अध्यक्ष मा.श्री. प्रब्रम्हानंद मडावी (साहित्यिक) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.नंदकिशोर कुंभरे (नायब तहसीलदार मूल), मा. वर्षा नैताम (पोलीस उपनिरीक्षक), मा.श्री. डी.के. टिंगूसले (सहायक प्रकल्प अधिकारी), मा.श्री. अशोक येरमे (सामाजिक कार्यकर्ता), मा.श्री. कुमरे (पोलीस उपनिरीक्षक), मा.श्री. शेखर पाटील (सहायक लेखाधिकारी), मा.कु. भवरे (गृहपाल) तसेच वसतिगृहाचे गृहपाल श्री. प्रशांत फरकाडे आणि कु. संगीत गजभिये उपस्तीथ होते.
माननीय श्री परतेकी साहेब(पोलीस निरीक्षक) यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून ते ध्येय साध्य होईपर्यंत शांत बसू नये. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले.
माननीय श्री प्रब्रह्मानंद मडावी (साहित्यिक) यांनी अध्यक्ष भाषणात आदिवासी समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या थोर महात्म्यांचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला. जयपाल सिंग मुंडा यांचे जीवनावर श्री प्रब्रह्मानंद मडावी यांनी पुस्तक लिहिले असून अनेक कविता व साहित्याचे लेखन केले आहे. माननीय वर्षा नैताम (पोलीस उपनिरीक्षक) यांनी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड होण्याकरिता कोणकोणत्या परिस्थितीचा सामना केला याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. परिस्थिती वाईट आहे म्हणून स्वतःला कमी समजू नका तर त्या वाईट परिस्थितीला संधी समजून त्याचा सामना करा असे मार्गदर्शन केले. तसेच मुलींनी सुद्धा आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहन केले. श्री नंदकिशोर कुंभरे (नायब तहसीलदार मूल) यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, त्याचे नियोजन कसे करावे. तसेच विविध स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी द्याव्या याबाबत मार्गदर्शन केले.
सहाय्यक प्रकल्प अधिकारी माननीय श्री डी के टिंगूसले यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालय मार्फत मिळणाऱ्या योजनांची माहिती दिली. माननीय श्री शेखर पाटील आणि माननीय श्री कुमरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील येणाऱ्या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शनानंतर लगेचच क्रीडा स्पर्धेमध्ये विजेत्या संघाचे बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले. वस्तीगृहातील विद्यार्थी योगेश सिडाम आणि विद्यार्थिनी दिपाली मडावी यांना आदर्श विद्यार्थ्यांचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
मार्गदर्शन कार्यक्रमानंतर लगेचच विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळण्याकरता सायंकाळी 6 ते 10 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी पारंपारिक नृत्य, नाटक व गीत गायन यांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सिडाम (विद्यार्थी), प्रास्ताविक श्री प्रशांत फरकाडे (गृहपाल) तर आभार प्रदर्शन साक्षी घरत (विद्यार्थिनी) यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता श्री संदीप पारचे, शुभम गावतुरे, श्री राजकुमार उराडे, मयूर गेडाम, सौ. काजल दुधे, श्री. प्रवीण निमगडे, सौ. अनिता गेडाम आणि समस्त विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी सहकार्य केले.
0 Comments