दुय्यम निबंधक कार्यालय, प्रशासकीय भवनात स्थानांतर होणार ; भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष राकेश ठाकरे यांच्या प्रयत्नाला यश
मूल प्रतिनीधी
सर्वच शासकीय कार्यालय एकाच भवनात असावेत अशी संकल्पना ध्यानात ठेवून भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राकेश ठाकरे यांनी गेल्या अनेक वर्षापासून भाड्याने असलेले दुय्यम निबंधक कार्यालय हे प्रशासकीय भवन मध्ये स्थानांतरित करण्याबाबतचे निवेदन माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. सुधीर मुनगंटीवार यांना दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी दिले. त्यानंतर सुद्धा राकेश ठाकरे यांनी निबंधक कार्यालयांचे तात्काळ स्थानांतरण प्रशासकीय भवनात करुन जनतेला होणाऱ्या त्रासातून मुक्तता देण्याची मागणी लावून धरली होती.
आज दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी आमदार मुनगंटीवार मुल येथे आले असता पुन्हा एकदा राकेश ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दुय्यम निबंधक कार्यालय प्रशासकीय भवनात स्थानांतरित करण्यात यावे अशी विनंती केली. आमदार मुनगंटीवार यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना दुय्यम निबंधक कार्यालय हे प्रशासकीय भवन येथे स्थानांतर करण्याचे आदेश दिले असून काही दिवसातच दुय्यम निबंध कार्यालय हे प्रशासकीय भवनात स्थानांतर होणार असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे मूल शहराध्यक्ष राकेश ठाकरे यांनी दिली.
0 Comments