Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे राज्यस्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन

कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे राज्यस्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन


मुल -  शिक्षण प्रसारक मंडळ मुल संचालीत व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे दिनांक ११जानेवारी, २०२५ ला माजी खासदार व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. वी.तू.नागपुरे स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री. शशिकांतजी धर्माधिकारी साहेब व प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष ऍड. अनिल वैरागडे साहेब, तसेच जनता महाविद्यालय चंद्रपूर येथील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. कोंड्रा सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मंचावर प्रा.दिनेश बनकर व डॉ. गणेश आगलावे उपस्थित होते. तसेच स्पर्धेकरिता परिक्षक म्हणून श्री. अशोक येरमे व डॉ. संदीप मांडवगडे होते. या स्पर्धेकरिता विविध महाविद्यालयातील एकूण १६ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांनी केले. त्यामधे त्यांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्साहित करीत सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे सूत्र संचालन प्रा. सिकंदर लेनगुरे व प्रा. सागर मासिरकर यांनी केले. स्पर्धेच्या प्रारंभा पासून तर अंतिम क्षणापर्यंत अनेक सुमधुर देशभक्तीपर गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यामुळे सभागृहातील वातावरण अत्यंत देशभक्तिमय झाले होते.या सर्व स्पर्धकांना त्यांच्या गीताकरिता श्री. संघपाल मुंडे व वाद्यवृंद यांनी उत्तम साथ दिली. या स्पर्धेमधे  हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी चंद्रपूर चा विद्यार्थी प्रज्वल धर्मेंद्र मेश्राम याने प्रथम पुरस्कार प्राप्त केला, तर द्वितीय पुरस्काराचा मानकरी ठरला  सुशांत प्रकाश मानकर, पी.जी.टी.डी. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. या विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये मान. शशिकांतजी धर्माधिकारी साहेबांनी विद्यार्थ्यांना संगीत शिकणे व त्याचा सतत सराव करणे असा गुरुमंत्र दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सिकंदर लेनगुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा डॉ. गणेश गायकवाड यांनी सांभाळली. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व असंख्य विदयार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments