Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मरेगाव - चितेगावात वाघाच्या भितीने मुनादी, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

मरेगाव - चितेगावात वाघाच्या भितीने  मुनादी, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

मूल  (अमित राऊत)


तालुक्यातील चितेगाव मरेगांव  परिसरात वाघाची दहशत आहे.त्यामुळे या परिसरात ​भितीचे वातावरण आहे.वनविभागाच्या मार्फतीने ग्रामपंचायतीने मरेगाव, चितेगावात मुनादी दिली.तसेच नागरिकांना सतर्क बाळगण्याची विनंती केली.चितेगाव,मरेगाव आणि बेलघाटा परिसरात मार्निंग वॉक करू नये अशी सूचना करण्यात आली आहे. नुकतेच या परिसरात वाघाने एका उंटाला ठार केले होते.तसेच या परिसरातील गुराख्याला जखमी केले होते.मरेगाव येथील शेतक—यांच्या जनावरांना सुदधा वाघाने मारले होते.मूल तालुक्यातील ही गावे सावली तालुक्यातील वनविभागातंर्गत येत असल्याने सावली वनविभागाचे अधिकारअलर्ट मोड वर आले आहे. नरभक्ष वाघाला पकडण्यासाठी मागिल एक आठवडयापासून या परिसरात रेस्कू टिम तैनात करण्यात आली आहे.या परिसरात एक वाघ आणि एक वाघिण असल्याचे मरेगाव येथील पोलिस पाटिल पुंडलिक जवादे यांनी सांगितले.त्यामुळे या परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. रेस्कू टिमला नरभक्ष वाघ हुलकावणी देत आहे.वाघाचे लोकेशन तपासण्या जात असून त्या त्या परिसरात टिमची धावाधाव होत आहे.  त्यामुळे चितेगाव ,मरेगाव  या परिसरात सतर्कता बाळगण्याच्या दृष्टीने मुनादी देण्याचे काम दररोज करण्यात येत आहे.वाघाला तात्काळ  जेरबंद करून नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी होत आहे.वाघाच्या भितीमुळे सकाळी आणि सायंकाळी चार वाजता चे नंतर गाव परिसरात आणि बेलघाटा परिसरात गावक—यांनी फेरफटका मारणे टाळले आहे. 


वनविभागाने वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा.गावकरी दहशतीत आहे.शेतक—यांची शेतीची कामे या भितीमुळे थांबली आहे. गावक—यांच्या मागणीचा वनविभागाने विचार करावा.  संजय मसराम,सदस्य,ग्रामपंचायत,चितेगाव

Post a Comment

0 Comments