Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

भेजगाव येथील मोतीबिंदू तपासणी शिबिरात 140 रुग्णांची तपासणी ; 105 रुग्णांची होणार शस्त्रक्रिया

भेजगाव येथील मोतीबिंदू तपासणी शिबिरात 140 रुग्णांची तपासणी ; 105 रुग्णांची होणार शस्त्रक्रिया


मूल : तालुक्यातील भेजगाव येथे समता फाउंडेशन मुंबई व सक्षम बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था भेजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य  साधून निशुल्क मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि.३) ला भेजगाव येथील ग्रामपंचायत पटांगणावर करण्यात आले.
         या कार्यक्रमाचे उद्घाटन मूल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी एच राठोड यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मूल पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश गांगरेड्डीवार यांनी तर प्रमुख अतिथी म्हणून सक्षम संस्थेचे अध्यक्ष शशिकांत गणवीर,  उमेदच्या जिल्हा समन्वयक प्रसन्ना विके, उमेदचे संतोष वाढई, रुपेश आदे, मनिष मोहुर्ले, केंद्र प्रमुख गजेंद्र कोपुलवार, मुख्याध्यापक प्रकाश निमगडे ग्राम विकास अधिकारी उमेश आकुलवार, विलास सोनुले, राजु कोसरे, समता फाउंडेशनचे आकाश निकुरे , जालिद मोहुर्ले, निमाताई शेन्डे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
        मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिराला मुल तालुक्यातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला असून या शिबिरात तब्बल 140 रुग्णांची तपासणी केली गेली यापैकी मोतीबिंदू असलेल्या 105 रुग्णांवर नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वानाडोंगरी नागपूर येथे रुग्णांची शस्त्रक्रिया होणार आहे.
          या शिबिराला शेकडो नागरिकांनी उपस्थित होते.  तर कार्यक्रमाचे यशस्वी संचालन प्रितम आकुलवार यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गणवीर यांनी केले.आभार सारिका बावणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता मनोज गणवीर, हर्ष गणवीर, गुलशन लाकडे,  गिताबाई गणवीर,पौर्णिमा गणवीर, ज्योती गणवीर आदींनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments