चिखली येथे कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न ; बक्षिसांची मेजवानी
मूल (अमित राऊत)
मूल तालुक्यातील चिखली येथे जय श्री हनुमान क्रीडा मंडळ चिखली च्या वतीने तीन दिवसीय कबड्डी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. गावामध्ये जय श्री हनुमान क्रीडा मंडळ च्या सभासदांनी गावातून लेझीम मिरवणूक काढून उदघाटक तथा प्रमुख पाहुण्याच्या साहाय्याने कबड्डी स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. कार्यकामाचे उदघाटक म्हणून नंदु नैताम सरपंच ग्रा प. चिखली, कार्यक्रमाचे अध्यक्ष दुर्वास कडसकर उपसरपंच ग्रा. पं. चिखली कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती पांडुरंगजी उईके सेवानिवृत्त एस. आर. पी. एफ दल , सत्कार्मुर्ती विमल सदाशिव भोंगारे सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गावचे प्रतिष्ठित नागरिक उमाजी दादा मंडलवार, विश्वनाथ काकडे, पूनमताई मडावी, पोलीस पाटील चिखली, राकेश जोलमवार ग्रा प सदस्य, शीतल कोवे, ग्रा. पं सदस्य उर्मिला कडसकर ग्रा. प. सदस्य, लहुजी पा. कडसकर ग्रा पं. सदस्य, बबन पा. कडसकर, उमाजी पा. चुदरी, सुरेश बावणे, पंकज कडसकर महसूल सेवक, मंडलवार प्राचार्य देवणील शाळा मुलं, राजू देवजवार, कैलास कडसकर, संतोष कडसकर, मधुकर कडसकर, सुभाष सुरपाम, उमेश पाल, मनोज कोवे, राकेश गेडाम तसेच गावातील युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments