Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कवीने निर्भयपणे अभिव्यक्त झालं पाहिजे - डॉ. विद्याधर बन्सोड

कवीने निर्भयपणे अभिव्यक्त झालं पाहिजे - डॉ. विद्याधर बन्सोड

 

मुल : तालुक्यातील बेंबाळ सारख्या खेड्यातील एक कष्टकरी मुलगा कवितासंग्रह काढतो ही खूप मोठी गोष्ट आहे. अंगुलीमाल उराडे यांची कविता आशावादी आहे. परिवर्तनाचा वसा घेतलेली आहे. त्यांची कविता वास्तववादी व विद्रोहाचा वसा घेतलेली आहे. कवीने लिहित राहिलं पाहिजे. आपल्याला ज्या भाषेत अभिव्यक्त व्हावंसं वाटतं त्या भाषेत व्यक्त झालं पाहिजे. आपल्याला गुलाम करणाऱ्या व्यवस्थेच्या विरूद्ध कवीने व्यक्त झालं पाहिजे. अंगुलीमालची कविता तशी व्यक्त होते. भविष्यात एकलव्याचा अंगठा कोणीही मागू नये म्हणून अभिव्यक्त व्हा. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ज्ञान परंपरेचे पाईक आहोत म्हणून लिहा. तुम्ही तथागताच्या चिकित्सा परंपरेचे पाईक आहात म्हणून लिहा. आपले स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून लिहा. माणसाला महान करण्यासाठी लिहा. भाषेच वैभव उभं करण्यासाठी लिहा. अत्त दीप होण्यासाठी लिहा. संविधान संस्कृती जपण्यासाठी लिहा. लिहीत रहा! दिनांक १ डिसेंबर रोजी आनंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय तर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंगुलीमाल उराडे यांच्या "हे विश्व शब्दांचे" काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. विद्याधर बन्सोड यांचे प्रतिपादन.

            दिनांक १ डिसेंबर रोजी आनंद विद्यालय, बेंबाळ येथे काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा व कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. विद्याधर बन्सोड होते तर उद्घाटक म्हणून डॉ. इसादास भडके यांची उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून अरुण झगडकर, आनंद विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कुंभारे, स्मिता कुंभारे आणि आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या सोहळ्याच्या संचालन रोशनी दाते यांनी केले तर अनुराग गोवर्धन यांनी आभार मानून या सोहळ्याची सांगता केली. उत्साही सहित्यप्रेमिंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने परिसरात साहित्यिक वातावरणात नवसंजीवनी दिली. "हे विश्व शब्दांचे" हा काव्यसंग्रह नक्कीच नव्या साहित्यिक प्रवाहाला चालना देईल. असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments