Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

जननायक बिरसा मुंडा यांचा लढा तरुणांसाठी आदर्श - साहित्यिक प्रब्रम्हानंद मडावी

जननायक बिरसा मुंडा यांचा लढा तरुणांसाठी आदर्श - साहित्यिक प्रब्रम्हानंद मडावी

मूल (अमित राऊत)


भारताच्या स्वातंत्र लढ्यात अनेक आदिवासी शहिद विराणी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या त्यागाचा आणि बलिदानाचा परिचय दिला आहे. त्यामुळेच जननायक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा क्रांतीलढा देशभरातील तरुणासाठी आदर्श ठरला असून जागतिक पातळीवर त्यांची दखल घेतली जात आहे असे प्रतिपादन चितेगाव येथे बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित समाजीक प्रबोधन कार्यक्रमात उदघाटक म्हणून बोलतांना आदिवासी साहित्यिक तथा कवी  प्रब्रम्हानंद मडावी  यांनी व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते शशीकांत मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान मडावी,  रवींद्र उईके ब्रम्हपुरी अरुण पेंदाम, अरुण मेश्राम, निशा उईके, विलास कोवे, आदिवासी समाजाचे अध्यक्ष चंद्रभान येरमे, तंटामुक्ती अध्यक्ष गिरीधर उईके, डॉ.कोमल उईके, ग्रामसेवक मडावी, विनोद मडावी इत्यादी मान्यवर उपस्थिती होते.

सर्वप्रथम गावातून शहीद बिरसा मुंडा,बाबुराव सेडमाके आणि तंट्या भिल्ल यांच्या वेशभूषेत गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात समाजबांधव आणि गावातील नागरिक उपस्थित होते. आदिवासी नृत्यांनी पाहुण्याचे  स्वागत करण्यात आले. सायंकाळी सामाजिक स्नेहभोजन तथा रात्रौ राणी दुर्गावती आदिवासी महिला दंडार मंडळ चितेगाव यांनी 'उध्वस्त' हा तीन अंकी प्रयोग सादर करून लोकांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे संचालन मनीषा उईके यानी तर आभार ज्योती मेश्राम यांनी मानले. कार्यक्रच्या यशस्वीतेसाठी सर्व आदिवासी समाजबांधवानी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments