सावली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोंढोली येथील विद्यार्थ्यांचे सुयश
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी 2024 निमगाव येथे संपन्न झाली. यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोंढोली या शाळेनी अंध व्यक्तीसाठी स्मार्ट चष्मा तयार केला होता.या मॉडेलची अंध व्यक्तींसाठी उपयुक्तता लक्षात घेऊन याला द्वितीय पारितोषिक मिळाले.ही प्रतिकृती तयार करणारे विद्यार्थी आरव किशोर लटारे,सृष्टी बोदलकर ,हिमांशू शालिक खोबे यांचे प्रमाणपत्र तसेच शिल्ड देऊन गौरविण्यात आले.तसेच वक्तृत्व स्पर्धेत कु.प्रवृत्ती निलेश वासेकर हिला 6 ते 8 गटात प्रथम पारितोषिक मिळाले. या स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षिका कू. मंजु भोयर यांनी विशेष मार्गदर्शन केले.तसेच शाळेतील विज्ञान शिक्षक अविनाश घोनमोडे यांनी विज्ञान मॉडेल तयार करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी तथा शिक्षकांचे मुख्याध्यापक शिंदे सर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्मिता बोदलकर यांनी अभिनंदन केले
0 Comments