Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

चिखली येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात ; युथ फॉर जॉब संस्था व दिव्यांग संघटनासाजरा

चिखली येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा


युथ फॉर जॉब संस्था व दिव्यांग संघटना चिखली तर्फे  जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
 
कार्यक्रमाची सुरुवात गावातील दिव्यांग तर्फे परिसरात वृक्षारोपण करून सुरूवात करण्यात आली
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गुरुदेव सेवा मंडळ  अध्यक्ष (चिखली) डोपाजी पाटील कडस्कर  , प्रमुख अतिथी माजी सरपंच तसेच मार्गदर्शक  श्री उमाजी दादा मंडलवार  आणि ,  दिव्यांग संघटना अध्यक्ष एकनाथ काटवले जी  तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशांत घोगरे दिव्यांग मित्र चिखली , प्रफुल काटवले , सुबोध वाकुडकर  राजेंद्र कडस्कर  ,  यांची उपस्थिती लाभली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून . उमाजीदादा  मंडलवार अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ  तसेच  श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट  प्रमुख श्री बालाजी पाटील उपस्थित होते.

पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत  रोप वृक्ष  देऊन  युथ फॉर जॉब चंद्रपुर चे  अनघा मॅडम  जिल्हा समन्वयक मोहित वाकडे जी यांनी केले यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले. पाहुण्यांची व संस्थे ची  ओळख  कृष्णकांत घोगरे  यांनी करून दिली व कार्यक्रमाचे उद्धिष्ट सांगितले ,  यावेळी पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे  फेलो ट्रेनर व दिव्यांग मित्र  यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे कार्यकर्ते व प्रमुख पाहुणे यांनी जागतिक दिव्यांग दिनाविषयी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. तसेच दिव्यांग मित्र  यांनी ग्रामपंचायत तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व शेवटी संस्थेस सर्वपरी सहकारी करण्याचे आश्वासन दिले.

मोहित वाकडे   यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या व प्रशालेच्या विविध  उपक्रमाचा आढावा दिला. आणि संस्थे चे अनघा मॅडम यांनी संस्थे ची माहिती दिली  व विविध योजना यांचे लाभ कसे घ्यावे , आणि  दिव्यांग्यांना  येणाऱ्या समस्या यावर माहिती दिली ,सदर कार्यक्रमास  ग्रामपंचायत चिखली उप सरपंच  ग्रामसेवक ,आणि दिव्यांग संघटना चिखली , श्री हनुमान देवस्थान कन्हाळगाव चिखली
गुरुदेव सेवा मंडळ चिखली  येथील अतिथी यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजकार्यकर्ते कृष्णकांत घोगरे यांनी केले  व म्हणाले ‘‘प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. दिव्यांग बांधवांनाही सन्मानाने आपले जीवन व्यतीत करता यावे, यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे.’’ आणि सदर 
संस्थे तर्फे सर्व सेवा मोफत देण्यात येते तरी सर्वानी लाभ घ्यावा , तर शेवटी आभार  एकनाथ काटवले  यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व  दिव्यांग आणि पालकांना नास्ता चे  वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज चिखली येथे  विविध ऍक्टिव्हिटी घेण्यात  आल्या.यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व  इतर सहकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments