कर्मवीर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी निःशुल्क फॅशन डिझायनिंग व टेलरिंग शिक्षण
मूल प्रतिनिधी
शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालयात मूल व समता फाऊंडेशन मुंबई च्या संयुक्त विद्यमाने फॅशन डिझायनिंग डिप्लोमा कोर्स निःशुल्क शिक्षण सूरू झाले आहे.नविन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासोबतच याचे क्रेडिट वाढविण्याची ही एक संधी आहे. आज या कोर्स चे उद्घाटन मान.सौ.शुंभागीताई वैरागडे माजी मुख्याध्यापिका नवभारत कन्या विद्यालय मूल यांचे हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष अॅड.अनिल वैरागडे साहेब होते. या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.मान.शुभांगीताई वैरागडे मॅडमनी सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचे सोन करावं अशी ईच्छा व्यक्त केली.रोजगारभिमुक शिक्षण विद्यार्थ्यांना देता यावे म्हणून प्राचार्य डॉ.अनिता वाळके सतत प्रयत्नशील होत्या. समता फाऊंडेशन च्या मदतीने ही संधी मला मिळाली याचा आनंद त्यानी त्यांच्या शुभेच्छा मध्ये व्यक्त करुन समता फाऊंडेशन चे पदाधिकारी व महाविद्यालयाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने हा निःशुल्क कोर्स उत्तम पध्दतीने चालविण्याची ग्वाही त्यांनी दिली व सर्वांना प्रवेश घेण्याचे आवाहन केले.
0 Comments