सुशी-दाबगाव येथे वने व वन्यजीव जनजागृती कार्यशाळा
कृषक विद्यालय सुशिदाबगांव येथे ,संघर्ष बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य ,वनविभाग चंद्रपूर. अंतर्गत वने व वन्यजीव जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मान. भरडकर सर, तसेच प्रमुख अतिथी मा.धम्मराज नवले सर, संस्थाध्यक्ष संघर्ष बहुउद्देशीय संस्था तसेच प्रमुख अतिथी मा.वाघमारे सर, वनरक्षक केळझर मा.स्नेहल वाळके सर,शशांत देठे सर,मा. रूपाली शेंडे मॅडम,मा.वेनुदासजी शेंडे सर,मा.हर्षद देठे सर,मा..वाकडे सर,मा.भानारकर मॅडम व्यासपीठावर उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य देवता क्रांतीज्योती सावित्री फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून, पुष्पांजली वाहून करण्यात आली .या कार्यक्रमात संस्था अध्यक्ष मा.धम्मराज नवले सर यांनी मुख्याध्यापक भरडकर सर यांचा शाल, ट्राफी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर मुख्याध्यापक सरांनी मा. नेवले सरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .समस्त सदस्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेतून मा.धम्मराज नवले सरांनी विद्यार्थ्यास सखोल मार्गदर्शन केले आणि वने व वन्यजीव यांच्या बद्दल जागृती केली. त्यानंतर समस्त विद्यार्थ्यांना पृथ्वीवर प्रदूषणामुळे होणारे परिणाम तसेच वाघांचे गावांमध्ये होणारे आक्रमण आणि मनुष्याचे जाणारे बळी ,या सर्वांविषयी जागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मा. चिचघरे सर कृषक विद्यालय सुशीदाबगाव यांनी केले व कार्यक्रमांची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ व नाश्ता वाटप करून करण्यात आली.
0 Comments