Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

नागरिक टाकतात रस्त्यावरच कचरा ; चितेगाव ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

नागरिक टाकतात रस्त्यावरच कचरा ; चितेगाव ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष 


मूल तालुक्यातील चितेगाव येथील नागरिक गावातील कचरा, खत मुख्य रस्त्यावरच टाकत असल्याने रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चितेगाव येथील गुरुदास गोहणे यांचे घरापासून तर तलावापर्यंत हा रस्ता नेहमी सुरळीत सुरु असतो. याच रस्त्यावरून गावातील महिला धुणी धुण्याकरिता रोज जात असतात. नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत असल्याने तो अनेकांच्या घरात जात असून त्याचा नाहक त्रास होत आहे. कुटुंबांचे आरोग्य धोक्यात येत आहे. ग्रामपंचायत सदस्य वनिता विनोद देशमुख यांनी ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये वारंवार याची माहिती देण्यात आली, मात्र ग्रामपंचायतीकडून कुठलेही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे वारंवार त्रासून गेल्याने सदर समस्येचे निवारण करण्याकरिता ग्रामपंचायत सदस्य वनिता देशमुख यांनी मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

Post a Comment

0 Comments