विद्यार्थ्याना संगणकाचे ज्ञान असणे काळाची गरज - डॉ. श्रेया बोकारे ; विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी साधला संवाद
मूल (अमित राऊत)
भविष्यातील वेध घेणारी पिढी ही संगणकाचे ज्ञान घेतल्याशिवाय समोरील वाटचाल शक्य होणार नसल्याने शालेय शिक्षणापासून विद्यार्थ्याना संगणकाचे शिक्षण देणे काळाची गरज आहे. यासाठी पालकांनी सजग राहून संगणकाचे शिक्षण देण्यासाठी
प्रयत्न करावा.
विद्यार्थ्याच्या उन्नतीसाठी संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे मत भारत सरकारच्या अखत्यारीतील असलेल्या मुंबई येथील सी. डेक. च्या सहसंचालिका डॉ. श्रेया बोकारे यांनी केले. सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूलच्या वतीने संगणक साहित्याचा उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन बेंटली सिस्टीम मुंबईचे व्यवस्थापक स्नेहलकुमार बोकारे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष उच्च प्राथमिक शाळेचे अध्यक्ष नरसिंग गणवेंनवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. मारोतराव पुल्लावार, उपाध्यक्ष सुखदेव चौथाले, शाळा व्यवस्थापक समितीच्या उपाध्यक्ष सुवर्णा पिपरे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष इंदू मडावी, समितीचे सदस्य रुपेश मारकवार, माजी सैनिक मारोती कोकाटे, उषा शेंडे, उषा थोराक, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप यांनी शाळेतील विद्यार्थी हे मध्यमवर्गीय पालकांचे दाखल असुन सर्वच विद्यार्थ्याना उत्तम शिक्षण देता यावे यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन शाळा करीत आहे. संगणकाची ओळख व्हावी यासाठी प्रयत्नरत आहेच. शाळेला मिळालेल्या संगणक साहित्याचा योग्य वापर करून विद्यार्थ्याना निपुण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी संगणकाचे शिक्षण सर्वांना आवश्यक असुन त्याशिवाय विद्यार्थी स्पर्धेत टिकणार नाही. यासाठी नवीन सॉफ्टवेअर देण्याचे आश्वासन स्नेहकुमार बोकारे यांनी देत ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील संगणकाचे ज्ञान घेवुन नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक बंडु अल्लीवार तर उपस्थितांचे आभार अजय राऊत यांनी मानले.यावेळी शाळेच्या सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्य व शिक्षकवृंद उपस्थित होते.
0 Comments