Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आवड व क्षमतांना ओळखून करिअर निवडावे - प्राचार्य डॉ. अनिता वाळके ; कर्मवीर महाविद्यालयात मूल येथे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आवड व क्षमतांना ओळखून करिअर निवडावे - प्राचार्य डॉ. अनिता वाळके ; कर्मवीर महाविद्यालयात मूल येथे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम 

मूल प्रतिनीधी


शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मुल तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर ,संकल्प फाउंडेशन गडचिरोली व राष्ट्रीय सेवा योजना कर्मवीर महाविद्यालय मुल यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर मार्गदर्शन कार्यक्रम महाविद्यालयात घेण्यात आला.या मिशन दिशांकित करिअर मार्गदर्शनाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिता वाळके होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गुज्जनवार शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मुल, प्रा. बनकर सर पर्यवेक्षक,अमोल बल्लावार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर, कु.संतोषी सूत्रपवार संकल्प फाउंडेशन गडचिरोली, आनंद गोंगले पंचायत समिती मुल उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. अनिता वाळके  यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात करिअर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आज फार महत्त्वाचे आहे. यामुळे विद्यार्थी च्या जीवनाला दिशा मिळणार यावर सविस्तर माहिती देऊन करिअर मार्गदर्शन हे वैयक्तिक आवड, क्षमतांना ओळखून आणि भविष्यातील संधी लक्षात घेऊन योग्य करिअर निवडण्यास हातभार लावते असे विचार व्यक्त केले. गुज्जनवार मॅडम शिक्षण विस्तार  अधिकारी पंचायत समिती मुल यांनी आपल्या प्रास्ताविकेत तुमच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी योग्य कौशल्यांचा अभ्यास, मार्गदर्शकांचे मत आणि संधीचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते. असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अमोल बल्लावार सर आणि कुमारी संतोषी सूत्रपवार यांनी करिअरच्या विविध पर्यायांबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना स्पष्टता मिळवून देण्यावर भर दिला.तसेच विद्यार्थ्यांना पत्रकारिता आणि मराठी भाषेच्या क्षेत्रातील करिअरच्या संधी बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. विविध अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. 

याशिवाय कौशल्य विकासावर आधारित कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. सिकंदर लेनगुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. निखिल दहिवले यांनी केले .या कार्यक्रमाला महाविद्यातील सर्व प्राध्यापक वृंद ,कर्मचारी व विद्यार्थी तसेच नवभारत कन्या विद्यालय मुल, माउंट कॉन्व्हेंट मूल, बल्लारपूर पब्लिक स्कूल या शाळेतील प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Post a Comment

0 Comments