Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

'हे विश्व शब्दांचे' कवितासंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा !

'हे विश्व शब्दांचे' कवितासंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा !

मूल प्रतिनीधी

१ डिसेंबर २०२४ साहित्याच्या जगात एक नवे प्रकाशकिरण घेऊन येणारा 'हे विश्व शब्दांचे' हा कवितासंग्रह आज आनंद विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात प्रकाशित झाला. उदयोन्मुख कवी श्री अंगुलीमाल मायाबाई उराडे यांच्या या कवितासंग्रहाने ग्रामीण साहित्य क्षेत्राला एक नवी ओळख मिळवून देत आपली पहिली परंतु लक्ष्यवेधी उपस्थिती दर्शवली आहे

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. विद्याधर बन्सोड होते, तर उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. इसादास भडके यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नामांकित साहित्यिक मा. पद्मरेखा धनकर, मा. इरफान शेख आणि मा. प्रशांत दामले उपस्थित होते.

साहित्यिकतेच्या मुळाशी जाणारा हा कवितासंग्रह शब्दांच्या माध्यमातून मानवी भावनाचा शोथ घेतो. या संग्रहातील कवितानी प्रेम, वेदना, संघर्ष आणि आशेची नवी परिभाषा उलगडली आहे कवितामधील शब्दांचे वजन आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना या वाचकाच्या मनाला भिडणाऱ्या आहेत असे मान्यवरांनी आपल्या भाषणात नमुद केले

आनंद विद्यालयाचे श्री पी. डी. वाळके सर यांनी प्रास्ताविक सादर करताना श्री अंगुलीमाल मायाबाई उराडे यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले चंद्रपूर झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्री. अरुण झगडकर यांचे कवितासंग्रहावरच भाष्य उपस्थितांना अंतर्मुख करून गेले

कार्यक्रमात आनंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजय कुंभारे आणि मा सिद्धार्थ रामटेके यानी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करत कविताच्या सामाजिक आणि वैयक्तिक महत्त्वावर भर दिला.

कार्यक्रमाचे संचालन मा. रोशनी दाते यांनी प्रभावीपणे केले तर श्री अनुराग गोवर्धन यानी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात आनंद विद्यालयाचे लिपिक श्री निखिल भामदारे आणि श्री शरद गनलावार यांनी विशेष योगदान दिले. 

उत्साही साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळयाने परिसरातील साहित्यिक वातावरणाला नवसंजीवनी दिली. 'हे विश्व शब्दाचे' हा संग्रह नक्कीच नव्या साहित्यिक प्रवाहाला चालना देईल, असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments