Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मच्छीमार भोई (धिवर) समाजाचा संतोषसिंह रावत यांना पाठींबा ; निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय

मच्छीमार भोई (धिवर) समाजाचा संतोषसिंह रावत यांना पाठींबा ; निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय



होवू घातलेल्या बल्लारपूर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मच्छीमार सहकारी संघ चंद्रपूर तालुका शाखा मूलच्या पदाधिकाऱ्यांचे नेतृत्व करणारे मागास वर्ग आयोगाचे सदस्य, मच्छीमार सहकारी संघाचे संचालक,हे नेहमी पुढाकार घेऊन शासन स्तरावर भोई समाजाच्या हक्कासाठी शासन स्तरावर दबाव आणून मागणी करणारे  स्थित मूलचे रहिवासी निवृत्त न्यायाधीश मांन. चंद्रलाल मेश्राम, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, मच्छीमार संघ चंद्रपूर अध्यक्ष विलास शेंडे, संचालक पांकज शेंडे, महर्षी वाल्मिकी, व्ही.जे.एन. टी.विभाग तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गेडाम यांचे उपस्थितीत बल्लारपूर विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार श्री. संतोषसिंह रावत यांनी प्रत्यक्ष निवास स्थानी भेट घेऊन आपल्या संपूर्ण भोई (ढिवर) समाजाचा  पाठिंबा जाहीर केला. 

मच्छीमार संघाने केंद्र व राज्य सरकारकडे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अनेकदा मागणी करण्यात आली असून केंद्राने नेहमीच आम्हाला गाजर दिले आहे. करीता मच्छीमार लोकांसाठी केंद्राने केलेल्या कायद्याचा आम्ही निषेधही नोंदवित असल्याचे सांगितले.

संतोषसिंह रावत यांचे निवासस्थानी आज पार एका बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही सांगितले. यापूर्वी मच्छीमार संस्थेने तलाव अतिक्रमण बाबत अनेकदा भाजपा सरकारला विनंती करूनही  आम्हाला न्याय दिला नाही. केवळ पोकळ आश्वासने देऊन मच्छीमार संस्थांची व भोई समाज बांधवांची दिशाभूल केल्याचेही सांगितले. त्यामुळे समस्त भोई समाजाने आता भाजपला मतदान करु नये असा निर्णय घेतल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments