Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीड़ा स्पर्धेत नैतिक ला रजत आणि यशस्वी ला कांस्य पदक

राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीड़ा स्पर्धेत नैतिक ला रजत आणि यशस्वी ला कांस्य पदक

मूल प्रतिनीधी
 

क्रीड़ा व युवक सेवा संचलनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीड़ा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीड़ा स्पर्धेचे आयोजन धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुल मध्ये पार पडली सदर स्पर्धेमध्ये नागपुर,मुंबई,पुणे, अमरावती, नाशिक ,कोल्हापूर,लातूर आणि छत्रपती संभाजीनगर हया आठ विभागाचा सहभाग होता.स्पर्धेत मूल येथील माऊंट कॉन्वेंट अँड ज्यू.कॉलेज ऑफ सायन्स चा विद्यार्थी नैतिक चंदू धोबे ह्याने १७ वर्ष आतील मुले वयोगटात आणि ५४ ते ५८ ह्या वजनगटात उत्तम खेळाचे प्रदर्शन करत रजत पदक पटकावले तर सेंट अँस हायस्कूल ची विद्यार्थीनी यशस्वी संदीप येनुगवार हिने १४ वर्ष आतील मुली ह्या वयोगटात व ५० कि.ग्रॅ.आतील ह्या वजनगटात कांस्य पदक पटकावून मूल तालुक्याचा क्रीडा क्षेत्रात नावलौकील केला आहे.स्पर्धेच्या ठिकाणी क्लब चे कोच साहिल खान यांनी खेळाडूच्या पाठीशी योग्य भूमिका पार पाडली.
नैतिक आणि यशस्वी च्या विजयावर जून्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया चे राष्ट्रीय प्रमुख विनय बोधे,माउंट कॉन्वेंट स्कूल आणि सेंट अँस हायस्कूल, मूल च्या मुख्याध्यापिका ,क्रीडा शिक्षक तथा अन्य शिक्षकवृंद आणि कराटे अँड फ़िटनेस क्लब मूल चे संचालक-प्रशिक्षक इम्रान ख़ान,निलेश गेडाम तथा पालकवर्ग यांनी आनंद व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments