Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

धानाचे पुंजणे जळून खाक ; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

धानाचे पुंजणे जळून खाक ; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

मूल (अमित राऊत )

मुल तालुक्यातील चांदापूर भेटी येथील पुंजणे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना काल दिनांक 26 नोव्हेंबर ला सायंकाळी सहा वाजून 30 मिनिटांचे दरम्यान घडली.

चांदापूर हेटी येथील शेतकरी महेंद्र लहानुजी निमकर, जयेंद्र लहानुजी निमकर, विजय एकनाथ देशमुख या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील धानाची कापणी करून जयेंद्र निमकर यांच्या शेतात पुंजणे करून ठेवण्यात आले होते. मात्र अज्ञात व्यक्तींनी निमकर यांच्या शेतात ठेवलेले पुंजणे जाळले. प्रत्येकी पाऊन एकराचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले असुन एकूण 80 हजार रुपयां पर्यंतचे नुकसान झाल्याची माहिती आहे. 

या तीनही शेतकऱ्यांनी मुल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. मुल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. तलाठी, कृषी अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Post a Comment

0 Comments