विद्यार्थ्यांनी घेतली सैनिकांची मुलाखत ; विद्यार्थी कट्टा आयोजित संवाद मनामनाचा
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गडीसुर्ला या शाळेच्या लोकप्रिय कार्यक्रमातून कुमारी आरुषी आवळे आणि कुमारी साक्षी कलसार या वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी गावातीलच नुकत्याच भारतीय सैन्य दलात निवड झालेले महेश चिठ्ठावार,आकाश ठाकरे आणि महेश लेनगुरे या सैनिकांची मुलाखती मधून संवाद साधला. मागील वर्षापासून शाळेनी संवाद मनामनाचा हा मुलाखतीचा उपक्रम सुरू केलेला आहे.विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कला गुणांना वाव मिळावा आणि संवदादरम्यान चर्चेतून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि सोबतच मुलांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुलाखतीला उपस्थित सैनिकांनी देखील मुलाखत घेणाऱ्या मुलांचे कौतुक केले. ज्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्याच शाळेत त्यांना मुलाखतीची संधी मिळाली त्यांचा गौरव झाला त्याबद्दल त्यांनीशाळेतील या होत असलेल्या कार्यक्रमाचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय मंत्रिमंडळ तसेच सुरेश टिकले,मुख्याध्यापक ,प्रशांत कवासे,राजेंद्र चौधरी,अविनाश श्रीगुरवार,विजय दुधे,शीतल खाडिलकर ,नवनीत कंदालवार या शिक्षकांनी प्रयत्न केले.
0 Comments