Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेकरिता मूल येथील कराटे खेळाडू रवाना

राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेकरिता मूल येथील कराटे खेळाडू रवाना


मूल:
क्रीड़ा व युवक सेवा संचलनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीड़ा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीड़ा स्पर्धेचे आयोजन धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुल मध्ये दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर ह्या कालावधीत पार पडणार आहे ह्या स्पर्धेत मूल येथील कराटे खेळाडूंनी दिनांक २४ आणि २५ नोव्हेंबर वर्धा येथे पार पडलेल्या नागपूर विभागस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत प्रथम स्थान पटकावत आपले स्थान निश्चित केले आहे ज्यात सेंट अँस हायस्कूल ची विद्यार्थीनी यशस्वी संदीप येनुगवार (१४ वर्ष आतील वयोगटात व -५० कि.ग्रा.ह्या वजनगट)  तर माउंट कॉन्वेंट अँड ज्यू. कॉलेज ऑफ सायन्स चे विद्यार्थी नैतिक चंदू धोबे (१७ वर्ष आतील वयोगट व ५८ की.ग्रा. वजनगट) आणि जैद सलीम शेख (१४ वर्ष आतील वयोगट व ६० कि.ग्रा आतील वजनगट) हे नागपूर विभागाचे नेतृत्व करतील.

राज्यस्तरीय स्पर्धेकरिता खेळाडू कराटे कोच साहिल खान ह्यांच्या मार्गदर्शनात खेळाचे नियोजन करतील. दिनांक २७ नोव्हेंबर (बुधवार) ला खेळाडू त्यांच्या सोबत चंद्रपूर वरून धुळे करिता रवाना झाले आहेत. 
तिन्ही खेळाडूंना त्यांचे पालकगण,सेंट अँस हायस्कूल,मूल व माउंट कॉन्वेंट अँड ज्यू. कॉलेज ऑफ सायन्स मूल च्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकवृंद तथा खेळाडू प्रशिक्षण घेत असलेल्या कराटे अँड फिटनेस क्लब चे मुख्य प्रशिक्षक इम्रान खान आणि निलेश गेडाम यांनी स्पर्धेकरिता शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Post a Comment

0 Comments