Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

राज्यात परिवर्तनाची लाट... गाफील राहू नका - विजय वडेट्टीवार ; मुल येथे महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक

राज्यात परिवर्तनाची लाट... गाफील राहू नका - विजय वडेट्टीवार ; मुल येथे महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक


मूल - राज्यात महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून यामुळें राज्यातील शेतकरी, शेतमजूर नौकरदार, कर्मचारी, महीला वर्ग, विध्यार्थी, बेरोजगार तरुण - तरुणी यांच्यात प्रचंड नाराजीचे वातावरण  आहे. तसेच राज्यांत गगनाला भिडलेली महागाई, महीला अत्याचार, गंभीर गुन्हे , गुंडाराज या सर्व बाबींमुळे हे भ्रष्ट महायुती सरकार सपेशल अपयशी ठरले आहे. आता राज्यांतील नागरीकांना परिवर्तन हवे असून येणारा सत्ताकाळ हा महाविकास आघाडीचा आहे.यामुळे कसलेही  गाफील न राहाता प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि विजय मिळवा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते बल्लारपूर - मुल विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या प्रचाराच्या नियोजनार्थ आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकी प्रसंगी बोलतं होते.

आयोजित बैठकीस काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी तथा मध्यप्रदेश आमदार कुणाल चौधरी, महाविकास आघाडी उमेदवार संतोषसिंह रावत, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, संदीप गड्डमवार, घनश्याम मुलचंदाणी, चंदू पाटिल मारकवार, बेबी उईकें, सूर्यकांत खणके, मयूर राईकवार, प्रकाश गांगरेड्डीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमित समर्थ, रामकृष्ण ओंद्रा, प्रमोद बोरीकर, दिलीप माकोडे, के. के. सिंग, अशोक निमगडे, डॉ.सुरेश महाकुलकर, चित्रा डांगे, करीम भाई शेख,गोविंद उपरे, कवडू कुंदावार पवन भागत, विजय चीमड्यालवार, करीम शेख उपरे पाटील, तथा अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यांतील महायुती हेकेखोर सरकार केवळ कमिशन खोरी, भ्रष्ट्राचार, उद्योगपतींची चाकरी करणारे आहे. येथील प्रकल्प गुजरातला पाठवून यांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली. राज्याची अस्मिता गुजरातला गहाण ठेवणाऱ्या या लुटारु सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठीं आपण तन - मन - धनाने महाविकास आघाडीचे हात बळकट करावे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी १८० ते १८५ जागा जिकणार असा सर्वे कर्त्यांचा अंदाज आहे. आता वेग वाढवा विरोधकांच्या खोटारड्या डावाला हाणून पाडा. असे आवाहन ही त्यांनी उपस्थितांना केले.

यावेळी मार्गदर्शनपर बोलताना महाराष्ट्र प्रभारी आमदार कुणाल चौधरी म्हणाले की, संतांच्या या पावन भूमीत महाभ्रष्ट , मनुवादी भाजप कडून थोर पराक्रमी राजे छत्रपती शिवरायांच्या पुतळा निर्मितीत भ्रष्ट्राचार करून त्यांचा अवमान केला जातो. जाती धर्मामध्ये भांडणे लावली जातात. देश विकायला काढणाऱ्या या महापापी साम्राज्याला सत्तेतून पूर्णतः हद्दपार करण्यासाठी आपण सर्व एकजुटीने काम केले पाहिजे असे ते म्हणाले.
या प्रसंगी  उमेदवार संतोष सिंह रावत यांनी विकास कोणाचं व कशाचा, महागाई,बेरोजगारी, वाघाचे हल्ले, पीक विमा सरकारचा नाकर्तेपणा याबाबत महाविकास आघाडी उमेदवार संतोषसिंह रावत आणि सामजिक कार्यकर्ते चंदू पाटिल मारकवार, यांनी उपस्थित होते.                      बल्लारपूर - मुल विधानसभा क्षेत्रात विकासाच्या थापा मारणाऱ्या भाजप नेते सुधिर मुनगंटीवार यांच्या फोल प्रचाराचा विशेष शैलीत खरपूस समाचार घेतला. तर चंदू पाटील मारकवार यांनी  भाजपचे उमेदवार किती खोटारडे आहेत. भेटायला गेलेल्या राजगड सरपंच व सदस्य यांचे गळ्यात भाजपचे दुपट्टे टाकून त्यांचे स्वागत केले. परंतु ते भाजपात प्रवेश केला  असे होत नाही.असा खुलासा काँग्रेसच्या आढावा बैठकीत जाहीरपणे    चंदुपाटील यांनी केला.यावेळी बल्लारपूर, मुल, पोंभूर्णा तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments