मूल - बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना सध्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असून महाविकास आघाडीने धर्मनिरपेक्ष वादाची भूमिका स्वीकारल्यामुळे भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. संतोषसिंह रावत यांचाही प्रचार शिगेला पोहचला असून जाहीर सभा, गृहभेटी यावर भर देल्या जात आहे. जाहीर सभेमधून महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत जाहीर सभेच्या व कॉर्नर सेभेच्या माध्यमातून रोजगार,महागाई, सिंचन, वीजदरवाढ ,गॅस सिलेंडर, इत्यादी महागाई, वीजदर वाढ यावर लक्ष केंद्रित करून सभेचा सपाटा सुरू केला आहे. अशातच जनसेवा गोंडवाना पार्टीचे उमेदवार संतोषशिंह रावत यांना जाहीर पाठिंबा दिला असून तसे लेखी पत्र पदाधिकाऱ्यांना जनसेवा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अवचीतराव सयाम यांच्या स्वाक्षरीने दिले आहे. जनसेवा गोंडवाना पार्टीतर्फे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. संतोषसिंह रावत यांना पाठिंबा जाहीर केल्याने रावत यांच्या मतात भर पडत असल्याचे दिसून येत आहे.
0 Comments