Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विरोधी उमेदवारांनीही मुनगंटीवार यांची केली होती स्तुती ; ते उमेदवार कोण? नेमकं काय घडलं होतं वाचा सविस्तर

विरोधी उमेदवारांनीही मुनगंटीवार यांची केली होती स्तुती ; नेमकं काय घडलं होतं वाचा सविस्तर


1989 मध्ये विद्यार्थी दशेत असतांना सुधीर मुनगंटीवार यांना त्यावेळचे दिग्गज खासदार शांताराम पोटदुखे यांचे विरोधात भारतीय जनता पार्टी—शिवसेनेने अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. खासदार शांताराम पोटदुखे यांचे सरदार पटेल महाविद्यालयात त्यावेळी सुधीर मुनगंटीवार शिक्षण घेत होते. विद्यार्थाने गुरू विरोधात लढलेली ही निवडणूक चांगलीच गाजली होती. 1989 मध्ये चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात चंद्रपूर जिल्हयातील मूल, चंद्रपूर, राजुरा, वरोरा या चार मतदार संघासह गडचिरोली जिल्हयातील अहेरी आणि सिरोंचा या दोन मतदार संघाचा समावेश होता. या निवडणूकीत कॉंग्रेस, भाजपा, भारतीय रिपब्लीकन पक्ष अशी तिहेरी लढत झाली. या लढतीत अहेरी येथील एका सभेत कॉंग्रेसचे उमेदवार शांताराम पोटदुखे यांनी ‘तुम्हाला मी आवडत नसेल, माझा पक्ष आवडत नसेल तर, तुम्ही सुधीर मुनगंटीवार यांना मत द्या, तो चांगला मुलगा आहे’ असे जाहीर वक्तव्य केले होते. या त्यांच्या भाषणाचीही चांगलीच चर्चा माध्यमात झाली होती. या निवडणूकीत शांताराम पोटदुखे यांना 2,43,853 (40.41%), सुधीर मुनगंटीवार यांना 1,93,397 (31.82%) भारीपचे राजे विश्वेश्वरराव महाराज यांना 60,270 (9.92%) मते मिळाली होती. पहिल्या निवडणूकीत मुनगंटीवार यांना पराभव पत्करावा लागला होता, मात्र आपल्या वक्तृत्व आणि सुस्वभावाने त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांसह, विरोधकांनाही आपलेसे केले होते. त्यांचा हाच सुस्वभाव आजवर कायम राहील्यांने, जनतेच्या ओठी आता ‘या मातीच्या सेवेसाठी यावा सुधीरभाऊ’ हे गाणं गुणगुणतांना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments