Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बांबुच्या वनातून फुलली रोजगाराची बाग ; मुनगंटीवार यांच्या विकासाने मिळविली आंतरराष्ट्रीय प्रशंसा

बांबुच्या वनातून फुलली रोजगाराची बाग
मुनगंटीवार यांच्या विकासाने मिळविली आंतरराष्ट्रीय प्रशंसा
 
चंद्रपूर,
"भाताची सळसळती शेते 
अन् बांबूचे रान 
गाई तुझेच गौरव गान"
चंद्रपूरच्या गौरव गीतातील या ओळींना सार्थक करत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील चिचपल्ली येथे जो बीआरटीसी प्रकल्प सुधिर भाऊंनी उभा केला त्यातून हजारोंना रोजगार मिळाला असून त्यामूळे विदेशात चिचपल्ली चे नाव पोहोचले आहे. या प्रकल्पातून आणखी समृध्दी मिळावी आणि महीला आत्मनिर्भर व्हाव्यात म्हणून पुन्हा मुनगंटीवार यांना निवडून देण्याची भावना लाभार्थी बहिणींनी व्यक्त केली आहे.
चिचपल्ली या गावाची ओळख विकासाच्या मुख्य धारेत कुठेच नव्हती. दलीत आणि आदिवासीं बहुल असलेले हे गाव फक्त वन विभागाचा डेपो म्हणून माहित होते. सुधिर भाऊंमुळे या गावातील दलीत नेतृत्वाला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत स्थान मिळाले. मात्र एवढ्यावर समाधानी न राहता सुधिर भाऊंनी या गावाला साता समुद्रापार नेण्याची योजना आखली. उजाळ माळ राना मध्ये बांबूची प्रशस्त इमारत बांधून त्याचा लौकिक विदेशात केला. बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र बनवून बांबूचे आधुनिक तंत्रज्ञान चिचपल्लीत आणले. यासाठी स्थानिक आदिवासीं आणि दलीत बेरोजगार युवक तसेच महिलाना आसाम राज्यांत नेऊन प्रशिक्षण दिले. याच प्रशिक्षित आदिवासीं आणि दलीत मुला मुलींनी 2014- 15 पासुन आजतागायत दोन हजाराच्या वर महीला मुली व युवकांना बांबूतून रोजगाराचे धडे दिलें. हे काम अजूनही अव्याहत सूरु आहे. 
*मोदींचे स्वप्न केलें साकार*
देशाची युवा पिढी स्वयंरोजगाराकडे वळावी. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीं म्हणतात. त्यासाठी त्यांनीं अनेक पूरक योजना सुद्धा सूरु केल्या. वन मंत्री असताना सुधिर भाऊंनी मोदींच्या या विचाराने प्रेरित होऊनच बीआरटीसी ची स्थापना केली. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. एवढेच नव्हे तर स्व. रतन टाटा यांच्या संस्थेशी करार करुन या योजनेचे भविष्य उज्ज्वल केले. मात्र मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात भाऊंच्या या प्रकल्पाची वाताहत झाली. त्यामूळे आता पुन्हा सुधिर भाऊंनी या प्रकल्पाची धुरा सांभाळावी आणि जोमाने विकास करावा म्हणून पुन्हा त्यांनाच या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व सोपवण्याची भावना या प्रकल्पाच्या लाभार्थी महिलांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments