वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष डेविड खोब्रागडे यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
मुल:- वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डेविड खोब्रागडे यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर व संतोषसिंहरावत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायासमोर काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत डेव्हिड खोब्रागडे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्यामुळे निश्चितच मुल तालुक्यात याचा मोठा फायदा काँग्रेस पक्षाला होणार. डेव्हिड खोब्रागडे यांचे सामाजिक कार्य हे मोठे असून तालुक्यातील बौद्ध समाजामध्ये त्यांची प्रतिष्ठा आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत हे एक उत्तम नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वाचा लहानपणापासूनच माझ्यावर पगडा आहे आणि आजपर्यंत त्यांनी केलेले कार्य हे माझ्यासाठी प्रेरणादायी असल्यामुळेच मी संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला असे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.
कांग्रेस पक्षाची विचारधारा व पक्ष संघटन वाढविण्याकरिता मी तन-मन-धनाने काम करेल आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार याची ग्वाही त्यांनी दिली.
0 Comments