Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

गांधींचे पोट्रेट काढून भारत सलाम यांनी केले गांधींना अभिवादन Mahatma Gandhi

गांधींचे पोट्रेट काढून भारत सलाम यांनी केले गांधींना अभिवादन

मूल (अमित राऊत)


2 ऑक्टोबर गांधी जयंती, गांधी जयंती Gandhi jayanti निमित्त जगभरात विविध कार्यक्रम उपक्रम साजरे केले जातात. यानिमित्ताने गांधीभक्त नागरिक गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करतात, सामुदायिक प्रार्थना केली जाते. शासकीय पातळीवर देखील गांधी जयंतीचा सोपस्कार पार पाडला जातो. Prayer

मूल येथील सुप्रसिद्ध कलावंत भारत सलाम यांनी गांधी जयंती निमित्त आज आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली. Bharat Salam
आपल्या कुंचल्यातून रंगाची किमया साधत त्यांनी ऑइल पेंटिंग मध्ये गांधीजीचे अप्रतिम पोट्रेट तयार केले. गांधी जयंती निमित्त गांधीजीचे पोट्रेट तयार करून भारत सलाम यांनी गांधीजींना आदरांजली वाहिली. 

यापूर्वीही भारत सलाम यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे सह अनेकांचे फोटो काढले आहेत. अनेक नामवंत ग्रंथांवर त्यांनी कोलाज पेंटिंग केलेले  मुखपृष्ठ प्रसिद्ध झाले आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असलेले नवभारत विद्यालयात कलाशिक्षक असलेले भारत सलाम यांच्या अप्रतिम कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments